वायगाव येथे गांजा विक्री करणारा युवक अटकेत
नावेद पठाण मुख्य संपादक
२ किलो ८०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त
वर्धा देवळी : पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निमजे (पो.स्टे. देवळी) हे आपल्या पथकासह वायगाव बिट परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की वायगाव निवासी शाहबाज रफीक काजी (वय ३०) हा आपल्या राहत्या घरात गांजा विक्रीसाठी साठवून ठेवत आहे.
या खात्रीशीर माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पंचांसह आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान काळ्या रंगाच्या बॅगेत २ किलो ८०० ग्रॅम हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेली ओलसर वनस्पती — म्हणजेच गांजा — एका पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत भरलेली आढळली.
या गांजाची किंमत अंदाजे ₹७०,६२५ इतकी (प्रति किलो ₹२५,००० प्रमाणे) असून, सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानुसार आरोपी शाहबाज रफीक काजी याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक, वर्धा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल मंडाळकर यांच्या निर्देशानुसार पो.उप.नि. प्रकाश निमजे, पो.हवा. अमोल आलवाडकर, पो.ना. स्वप्नील वाटकर, पो.का. नितेश पाटील व पो.का. मनोज नप्ते यांच्या पथकाने केली.